Friday, May 15, 2009

पॉलिटिक्स मिक्स - 2

Part 2 of the Politics Mix series. Part 1 was published on 10 April 2009.

( "याव याव खमौ ब्येब्स
डू द बीट्स नाउ
पंप अप द बेस डॉग!" )

सकाळ झाली सूर्य डोंबल्यावर आला,
म्या बी उठलो न आलो की ओसरीवर.
पाहतो तर काय,
आमचा आजा, होता फेरी घालीत.
दर दोन मिनिटांनी हात जोडीत,
न हात उंचावून शांत करण्याची नक्कल करीत.

मला वाटल म्हातारा वेडा झाला,
वयाच्या ऐंशीज मध्ये काय खूळ घेऊन बसला!

म्या म्हनला आज्याला,
"काय र आज्या, हे काय करून राहिला रे तू?"
"अस खादी घालून, ध्वॉतर नेसून,
एकटाच नमस्कार करीत काय फिरतोस?"

आजा नमस्कार करीत म्हनला (चिरक्या आवाजात),
"देखिये....हम इस बार गावाच्या सरपंच पद के लिये निवडणूक लढ रहे है"
अगदी श्वाकच बसला मला!
"आर आजा, तुझा वय आता ऐंशी, तू कशी काय लढणार विलेक्शन?"
"ह्या वयात हे जमणार कस तुला?"
(मनातल्या मनात म्हन्लो, " म्हातारा बहुतेक झालाय खुळा!")

आज्याने आपला थरथरणारा हात हळू हळू उचलला
न माज्या गालावर मायेने ठेवला.
म्या म्हन्लो, " आर, लाड कशापाई करतोस?"
"बोल, माज्या प्रश्नाच उत्तर कधी देतोस?"

तर वैतागून आजा म्हन्तो कसा,
"ए, भुस्नळ्या, म्या लाड न्हाई क्येले,
म्या तर तुझे मुस्काट फोडले!
माझे हात थरथरले म्हनून
तुला नाय कळले!"

"म्या असेन ऐंशी
पण अजुन पन जवान हाय,
परवाच उंदीर मारला,
म्या निडर हाये!
ट्वायिलेटला कदी जायाच
हेची तुझा बा न्हाय आठव करून देत,
म्याच ठरीव्तो!
म्या निर्णायक हाये!."

" म्हातारा झालो म्हुन काय झाल?
मला बी सत्ता ट्येस्ट करायची हे!"
म्या चक्रावलो, म्हन्लो,
" आर पण, गावातल्या यंग उमेदवारांच काय?"
आजा आन्खी वैतागला, " ए शान्या, गप र्‍हा की!
म्या विलेक्शन लढणार म्हंजे लढणार!
जास्त बोललास,
तर माझ्या 'लाल' छ्डीने 'आडवा आणी' उभा फोडून काढीन!"

म्या म्हटला " स्वाँरी आजा, माफी असावी!"
तर आजाचा थरथरणारा हात परत गालावर फिरला!
म्या वैतागलो, " आता कशापाई मारतो?
आजा आपले खोटे दात दाखवत म्हनला,
" म्या तुझा आजा, माज्या राजा!
म्या लाड केले नाही मारली मुस्काटात!
चल आता रुसु नकोस,
गाडी काढ आपली,
रथ यात्रा काढली पायजे,
ह्या यंग गावाला
म्या ऐंशी वर्षाचा तरुणच
नीडर नि निर्णायक बनवू शकतो,
हा नि चा पाढा पढवला पायजे!"

-प्रांजल वाघ


Creative Commons License
This work by Pranjal A. Wagh is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License

11 comments:

  1. VAAA......... Mitra todlas....

    ReplyDelete
  2. fantastic......zabardast..........

    ReplyDelete
  3. म्हातारा झाला तरी लोभ काही सुटत नाही,
    तरूण वरुण तर आपुल्या बाबाची री ओढी
    असल्या 'जनता' (?) पक्षाचा संग, बरा नाही ग बाई
    सत्तेच्या चिखलात काही, कमलाचे फूल उमलणार नाही!...

    ReplyDelete
  4. @ Sambha

    Waaa!!
    Raje Waaa!!

    apratim!

    ReplyDelete
  5. mitraaa...sahi aahe..
    aajchya divsala (ratrila) ekdam purak ashi kavita aahe...

    ReplyDelete
  6. lay bhari mitra...agdi my'ind blowing....

    vachta vachta Satarkar, nagpuri marathi chi athvan karun dilis!

    me bi ek esam la bhetlo..mala vicharto 'Swawalambhi Nagar' ka patta hai..idhar ko kasa jane ka...full on 'harathi' bhashet

    me hoto navin mhaun bajuchya la vicharle..to mhane..sahab mein sangto tyala! ek kam karo ..idhar se sidha janeka fir ...val val ke right maro(showing with hand towards left)...ridiculous

    ani ekda kay zhala sangu...
    ek mitra ala..tyachi bahin scooter var khelat hoti...porga lay caring ho

    mhane...ag radhika radhika...khedu nakos scooter var nahitar 'Sandshil'

    Jai Maharashtra!

    ReplyDelete
  7. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete